रत्नागिरी:-संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१९ मधील विभागस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा अंतर्गत रत्नागिरी शहरानजीकच्या नाचणे ग्रामपंचायतीने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
नाचणे ग्रामपंचायतीने शौचालयातील मैल्यापासून गांडूळ खतनिर्मितीचा प्रकल्प हाती घेतला. या सर्व कामाची दखल घेत नाचणे ग्रामपंचायतीचा कोकण विभागात तिसरा क्रमांक देऊन गौरव करण्यात आला आहे. नुकताच हा निकाल पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने हा पुरस्कार जाहीर केला. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील बापार्डे ग्रामपंचायतीला प्रथम तर वेंगुर्ला तालुक्यातील परुळे बाजार ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.