गाईच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी (ता. संगमेश्वर) येथील रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालवून स्वतःच्या व मागे बसलेल्याच्या दुखापतीस ; तसेच गाईच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध संगमेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश रामदास चव्हाण (वय ३०, रा. करबुडे फाटा, मुळ ः शिवाजीनगर, सोनगिरवाडी, ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ११) रात्री सव्वा आठच्या सुमारास धामणी पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हे दुचाकीवरुन सोबत रोहित मोहन चव्हाण यास घेऊन मुंबई ते गोवा महामार्गावरुन जात असताना धामणी येथील रस्त्यावर दुचाकी निष्काळजीपणे चालवून मोकाट फिरणाऱ्या गाईला जोरदार धडक दिली. या अपघातात ते स्वतःसह दुचाकीच्या मागे बसलेले रोहित चव्हाण यांना दुखापत झाली. तसेच या अपघातात गाईचा मृत्यूस कारणीभूत झाला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल उत्तम सासवे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलिस अमंलदार करत आहेत.