रत्नागिरी:- गव्हाचे पोते डोक्यावरून हॉटेलमध्ये नेताना त्या पोत्यासह पडल्यामुळे मणक्याला गंभीर दुखापत झालेल्या एका तरुणाचे जिल्हा शासकीय रूग्णालय येथे १२ दिवसांच्या उपचारानंतर निधन झाले. या प्रकरणी शहर पोलिसांकडे आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.
संतोष सीताराम पवार (४८, रा. मेमन हॉल, अल्फला कॉलनी मेहबूब वस्ता यांचा भाडोत्री, रत्नागिरी) असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. २ सप्टेंबर रोजी संतोष पवार हे त्यांचे मित्र महादेव केसरकर यांच्या हॉटेलजवळ गव्हाचे पोते उचलून त्यांना मदत करण्यासाठी गेले होते. गव्हाचे पोते उचलून ते आत हॉटेलमध्ये ठेवत असताना ते पाय घसरून पोत्यासकट पडले. त्यावेळी त्यांच्या मणक्याला मार लागला होता. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान १३ सप्टेंबर रोजी संतोष पवार यांचे निधन झाले.









