रत्नागिरी:- तालुक्यातील रानपाट-गोनबरेवाडी येथील प्रौढाने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. आदेश रत्नाकर गोनबरे (वय ४६, रा. गोनबरेवाडी-रानपाट, रत्नागिरी) असे गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केलेल्या प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २६) दुपारी दोनच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आदेश गोनबरे यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणातून सकाळी आठच्या सुमारास गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. शेजाऱ्यांनी याबाबत गावचे पोलिस पाटील यांना माहिती दिली. आदेशला उपचारासाठी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना दुपारी दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या बाबत पोलिस पाटील सुनिल गोनबरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली खबरीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.









