रत्नागिरी:- गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सौ. रिया संजय ठिक (वय ३४, रा. निरुळ, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १४) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी साडेचारच्या सुमारास सौ. रिया ठिक हिने कोणत्यातरी अज्ञात कारणातून गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तात्काळ तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होती. जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी दुपारी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता ती मृत झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









