गयाळवाडी रस्त्यावर अज्ञात टेम्पोची पादचाऱ्याला ठोकर

रत्नागिरी:- रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावरील गयाळवाडी रस्त्यावर अज्ञात टेम्पो चालकाने पादचाऱ्याला ठोकर दिली. या अपघातात पादचारी जखमी झाला. अपघात करुन पलायन करणाऱ्या चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. २०) सकाळी पाचच्या सुमारास गयाळवाडी रस्त्यावरील एका हॉटेलच्या पुढील बाजूस घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दिपक यशवंत केळकर (वय ४९, रा. सुयोग सोसायटी, कुवारबाव, रत्नागिरी) हे महालक्ष्मी मंदिर ते खेडशी असे चालत जात असताना गयाळवाडीच्या पुढच्या बाजूला असलेल्या चितारा समोर अज्ञात टेम्पो (क्र. एमएच-०८ पी ७२८७) वरिल अज्ञात चालकाने त्यांना ठोकर दिली. या अपघातात त्यांच्या हाताला, कपाळाला, तसेच डाव्या बाजूच्या बरगड्यांना, दोन्ही पायांना दुखापत झाली. अपघात घडताच टेम्पो चालकाने पलायन केले. या प्रकरणी दिपक केळकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.