गयाळवाडी येथे बोलेरो पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी‚कोल्हापूर मार्गावरील कुवारबाव नजीकच्या गयाळवाडी येथे बोलेरो पिकअपने दुचाकीला दिलेल्या धडकेत प्रसाद प्रकाश यादव (२८ रा.शांतीनगर ) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातानंतर परजिल्ह्यातील असलेला बोलेरो चालक गाडीसह फरारी झाला .