गणपतीपुळे समुद्रकिनारी अडकलेल्या व्हेल माशाला अखेर जीवदान

रत्नागिरी:- गणपतीपुळे येथे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाला जीवदान देण्यात अखेर यश आले आहे. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर मासा पुन्हा समुद्रात झेपावला.

सोमवारी सकाळी व्हेल माशाचे पिल्लू गणपतीपुळे किनारी वाहत आले. या पिल्लाला पुन्हा समुद्रात सोडण्यासाठी ऑपरेशन हाती घेण्यात आले. मत्स्य विभागच्या बोटीच्या साहाय्याने व्हेलं माशाच्या पिल्लाला समुद्रात ओढत नेण्यात आले.