रत्नागिरी:- तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी आलेल्या महिलांपैकी एक महिला गायब झाली. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली असून पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. सौ. सुनीता रामचंद्र
पाटील उर्फ निकिता असे गायब झालेल्या माहिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २१) ला घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सांगली येथून सौ. पाटील याच्यासह काही महिला पर्यटन व देवदर्शनासाठी आल्या होत्या. देवदर्शन
झाल्यानंतर त्या सर्वजणी गणपतीपुळे समुद्रामध्ये समुद्रस्नानास गेल्या होत्या. समुद्र स्नान चालू असताना सौ सुनीता या अचानक गायब झाल्या. त्यामुळे त्यांच्याबरोबर असलेल्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. महिलांनी तत्काळ त्यांच्या
राहत्या घरी संपर्क करुन त्यांच्या पतीला माहिती दिली. त्यानंतर सौ. पाटील यांचे पती रामंचद्र आबा पाटील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली असून जयगड
पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास गणपतीपुळे पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील व सहकारी सहाय्यक पोलिस फौजदार संदीप साळवी, पोलिस नाईक जयेश कीर, पोलिस कॉन्स्टेबल
निलेश गुरव अधिक तपास करत आहेत.