गणपतीपुळे – निवळी मार्गावर दोन इर्टिगा कारची समोरासमोर धडक

रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे ते निवळी जाणार्‍या रस्त्यावरील ओरी येथे दोन इर्टिगा कारमध्ये धडक होउन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. अपघाताची ही घटना रविवार 14 एप्रिल रोजी दुपारी 12.50 वा. घडली आहे.

अशोक नायकवाडी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात चंद्रकांत अंकुश केदार (27) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, काही दिवासांपूर्वी ते आपल्या ताब्यातील इर्टिगा कार (एमएच-13-डीवाय-8617) घेउन सोलापूर ते गणपतीपुळे असे देवदर्शनासाठी आले होते. देवदर्शन केल्यानंतर रविवार 14 एप्रिल रोजी दुपारी 12 वा. ते सोलापूरला परतत होते. दुपारी 12.50 वा. सुमारास ते चाफे पेट्रोलपंपा पुढे ओरी गावाच्या सिमेवर आले त्याच सुमारास अशोक नायकवाडी हा आपल्या ताब्यातील इर्टिगा (एमएच-10-ईए-8506) घेउन समोरुन येत होता. ही दोन्ही वाहने तेथील चढावात आली असता अशोकचा आपल्या ताब्यातील कारवरील ताबा सूटला आणि त्याने चंद्रकांत केदार यांच्या कारला उजव्या बाजुच्या मागील दरवाजाजवळ धडक देत हा अपघात केला. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून अशोक विरोधात भादंवि कायदा कलम 279,मोटाार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.