रत्नागिरी:- गणपतीपुळे समुद्रकिनार्यावर मोरया वॉटर स्पोर्टच्या पर्यटन बोटींवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला झेंडा लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भगवतीनगरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रविशेठ राजवाडकर यांनी हे झेंडे भेट दिले आहेत.
गणपतीपुळे समुद्रकिनार्यावर मोरया वॉटर स्पोर्टद्वारे पर्यटन व्यवसाय सुरू ठेवण्याचे व त्याचबरोबर गणपतीपुळे समुद्रात बुडणार्या व्यक्तींना वाचविण्याचे धाडसी काम गेल्या काही वर्षांपासून केले जात आहे. त्यांच्या बोटींवर महाराजांच्या प्रतिमेचा झेंडा उठावदार दिसावा म्हणून श्रीराम नवमीच्या दिवशी त्याचे वितरण करण्यात आले. यासाठी मालगुंड येथील राजेंद्र शिंदे यांनी प्रयत्न केले होते. यावेळी तेजस हळदणकर, शिरीष मयेकर, जितेंद्र पारकर, बाबू मयेकर, पत्रकार वैभव पवार, प्रमोद डोर्लेकर, ऋतिक मयेकर, निलेश मयेकर आणि अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी मोरया वॉटर स्पोर्टतर्फे रवीशेठ राजवाडकरांचा सत्कार करण्यात आला.









