खेड:- तालुक्यातील खोपी पिंपळवाडी धरणात म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू झाला. बाबाराम मालसिंग ढेबे (३६, रा. खोपी-रामजीवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
तो नेहमीप्रमाणे म्हशींना घेवून पाणी पाजण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला होता. याचदरम्यान त्याचा पाय चिखलात रुतल्याने बुडू लागला. काही वेळाने त्याची हालचाल बंद झाली. त्याला ग्रामस्थांच्या मदतीने पाण्याबाहेर काढण्यात आले. याबाबत पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









