दापोली:- तालुक्यातील खेर्डी देऊळवाडी येथील वृद्धाने घरातील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३१ मार्चला रात्री घडली. शांताराम रामचंद्र जाडे (वय ६५) असे मृताचे नाव आहे.
या घटनेची दापोली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही घटना लक्षात आल्यानंतर माहिती देणाऱ्या व्यक्तीने ग्रामस्थांच्या मदतीने शांताराम जाडे यांना खाली उतरवले आणि तातडीने रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.