खेड:- तालुक्यातील वाडी जैतापूर येथील बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून, बिबट्याच्या हल्ल्यात येथील शेतकरी सुभाष आत्माराम जाधव यांचा बैल ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता. १७) घडली.
सुभाष जाधव यांचा बैल सकाळी चरायला गेला होता; परंतु तो दुपारपर्यंत आला नाही म्हणून ते आपल्या बैलाला शोधण्यासाठी रानात गेले असता गेले असता संध्याकाळी चारच्या सुमारास त्यांनी बिबट्या बैलाला ठार मारल्याचे प्रत्यक्ष पाहिले. ही माहिती त्यांनी पोलिस पाटील बाळकृष्ण कासार यांना कळवली. पोलिस पाटील यांनी ताबडतोब खेड येथील वनरक्षक परमेश्वर डोईफोडे यांना फोन करून सांगितले. त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.