खेड:-खेडमधील लोटे तलारीवाडी येथे 18 एप्रिल रोजी मध्यरात्री दुकानाला लागलेल्या आगीत दुकानात झोपलेल्या एका 47 वर्षीय इसमाचा भाजून मृत्यू झाला. संतोष गंगाराम आखाडे (45, लोटे तलारीवाडी) भाजून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद सुरेश आखाडे (42, लोटे खेड) यांनी येथील पोलीस स्थानकात दिली. या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या घराजवळ असलेल्या दुकानाला सोमवारी मध्यरात्री आग लागली त्यावेळी दुकानात संतोष गंगाराम आखाडे हे एकटेच झोपलेले होते. या आगीत आखाडे हे भाजून मृत्यूमुखी पडल्याचे म्हटले आहे.