खेडशी येथे दुचाकीच्या धडकेत पादचारी प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी-महालक्ष्मीमंदिर रस्त्यावर दुचाकीची धडक बसल्याने पादचारी प्रौढाचा मृत्यू झाला. दुचाकी स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज रामचंद्र झेपले (रा. खेडशी, रत्नागिरी) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. 6) रात्री दहाच्या सुमारास खेडशी-महालक्ष्मीमंदिर रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री सुरज झेपले हा दुचाकी (क्र एमएच- 08 एई-1563 ) घेऊन भरधाव वेगाने जात होता. तो खेडशी येथील मंदिराजवळ आला असता त्याठिकाणी रस्ता ओलांडणार्‍या संदीप शांताराम सागवेकर (वय ४१. रा. धामापूर ता. संगमेश्वर) यांना दुचाकीची धडक बसल्याने ते रस्त्यावर पडले. त्यांना गंभीर दुखापत झाली. तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी असलेल्या वैद्यकिय अधिकार्‍यांनी संदीपला तपासून मृत घोषित केले ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून संशयित स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.