खेडशी ग्रामपंचायतीकडून “माझी रत्नागिरी माझी जबाबदारी”ची काटेकोर अंमलबजावणी 

रत्नागिरी:- शहराजवळील ग्रामपंचायत खेडशी येथे “माझी रत्नागिरी माझी जबाबदारी” या मोहिम यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. आतापर्यंत 777 घरातील 2917 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यात 13 जण बाधित सापडले आहेत.

कोरोना वर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.  खेडशी गावचे सरपंच तसेच ग्रामकृती दलाचे अध्यक्ष निरंजन ऊर्फ बाळा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावामध्ये मोहीम उत्तम प्रकारे राबविण्यात येत आहे. यामध्ये  उपसरपंच मानसी पेडणेकर, पोलिस पाटील शलाका सावंतदेसाई ग्रामपंचायत मधील सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण ताम्हणकर; तलाठी सत्यजित घाटगे आणि ग्रामपंचायत कर्मचारी तसेच तंटामुक्ती अध्यक्ष संतोष सावंत आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्राम कृती दलाचे सर्व सदस्य ; स्वयंसेवक यांचे योगदान मौलाचे ठरत आहे. तसेच गावात युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा पुढाकार घेऊन या मोहिमेला हातभार लावत आहेत. 

खेडशी गावात आतापर्यंत 777 घरांना भेट दिली. त्यात 2, 917 लोकांची तपासनी केली गेली. प्राणवायू पातळी आणि तापमान घेण्यात आले. 1064 लोकांची 6 मिनिटे वॉक टेस्ट घेण्यात आली. या मोहिमेत 13 जण कोरोना बाधित आढळले. त्यातील लक्षणें नसलेल्या लोकांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. तर काहींना कोविड सेंटर ला दखल करून घेण्यात आले. या मोहिमेला ग्रामस्थांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही मोहीम उत्कृष्ट रित्या पार पाडण्यासाठी गावचे सरपंच श्री. बाळा सुर्वे यांनी सर्व सदस्य ; कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांना शुभेछा दिल्या आहेत.