खेड:- तालुक्यातील लोटेमाळ माळवाडी येथे एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या सुरक्षा रक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुधाकर बाळू वास्कर (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना ०४ मे रोजी सकाळी १०.३० वाजण्यापूर्वी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे चिपळूण तालुक्यातील टेरव सुतारवाडी येथील रहिवासी असलेले सुधाकर वास्कर हे लोटे एमआयडीसीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते आणि लोटेमाळ माळवाडी येथे भाड्याच्या खोलीत एकटेच राहत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. ०४ मे रोजी ते त्यांच्या खोलीत छताला असलेल्या लाकडी भालाला नायलॉनच्या साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.