खेडमध्ये रेल्वेच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

खेड:- रेल्वेच्या धडकेने तालुक्यातील उधळे येथील 25 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला. अजय म्हादलेकर असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत तुतारी एक्सप्रेसच्या लोकोपायलटने कळंबणी रेल्वेस्थानकात खबर दिली. त्यानुसार पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.