रत्नागिरी:- पोटात दुखत असलेल्या तरुणीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. दिपाली दयानंद ठाकूर (वय २२, रा. खालची आळी, रत्नागिरी. मुळ ः दारीस्ते पवारवाडी ता. कणकवली, जि. सिंधूदुर्ग) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १७) पहाटे पाचच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिपाली हिला रविवारी घरी असताना अचानक पोटात दुखून जुलाबाचा त्रास सुरु झाला. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना गुरुवारी पहाटे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









