खवले विक्री प्रकरणी आणखी तिघांना अटक

लांजा:- तालुक्यातील रूण येथील खवले मांजराच्या खवले विक्री प्रकरणी लांजा पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली केल्याने यातील आरोपींची संख्या चार झाली आहे. तर यामुळे या खवले मांजराच्या तस्करीची पाळेमुळे अधिक खोलवर असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र चव्हाण याची जामिनावर मुक्तता झाली आहे. खवले मांजराची शिकार करून, खवले विक्रीसाठी ग्राहकांची वाट पहात उभ्या असलेल्या साटवली येथील जितेंद्र चव्हाण ज्या व्यक्तीला रुण फाटा येथून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा रत्नागिरी यांच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली होती. दिनांक 5 नोव्हेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली होती. मात्र खवळे मांजराच्या खवले विक्री प्रकरणाचा तपास लांजा पोलीसांनी सुरू केल्यानंतर यात आणखीन काही जण सहभागी असल्याचा पोलिसांचा कयास होता. या प्रकरणी पोलिसांनी आणखीन तीन जणांना अटक केली आहे. यामध्ये सुरेश नारायण शिनगारे (वय 29 राहणार गोलवशी तेलीवाडी), प्रमोद पर्शराम बाईंग( वय 37 बेनीबुद्रुक) आणि स्वप्नील धनाजी भोवड (वय 34 सडवली मावळतवाडी) या तिघांच्या मुसक्या आवलल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे अधिक खोलवर रुजली गेल्याचे स्पष्ट आहे