खरीप हंगामासाठी साडेतीन हजार मेट्रिक टन खत उपलब्ध

रत्नागिरी:- मॉन्सून तेंडावर आलेला असल्याने खरीप काळात जिल्ह्यातील शेतकऱयांना वेळेत खत पुरवठा होण्यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्dयासाठी या हंगामासाठी 21 हजार मे.ट.इतकी खताची मागणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 3 हजार 500 मे.टन खत पुरवठा उपलब्ध झालेला असून अजून दिड हजार मे.टन खत आठवडाभरात उपलब्ध होणार आहे.

प्रत्येक वर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर खतांच्या टंचाईला शेतकऱयांना सामोरे जावे लागू नये, यासाठी जिल्हा कृषी विभागामार्पत तयारी सुरू करण्यात येते. खरिपात निर्माण होणारी खतांची समस्या रोखण्यासाठी कृषी विभागाने लक्ष वेधले आहे. युरिया व डीएपीचा बफर स्टॉक करण्यावर भर दिला आहे. खतांची कमतरता खरोखरच भासू लागल्यास हा बफर स्टॉक खुला केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी या खरीपासाठी 290 मे.टन खताचा बफर स्टाŸक ठेवण्याचे नियोजन केलेले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण खरीप पिकाखालील क्षेत्र सुमारे 81995 हेक्टर इतके आहे. खरीप भातपिकाखालील क्षेत्र सुमारे-70572 हेक्टर, नागली क्षेत्र सुमारे 10236 हेक्टर एवढे क्षेत्र आहे. जिह्यातील गतवर्षी म्हणजे सन 2022-23 विविध खतांची 22146 मे.टन इतकी मागणी करण्यात आली होती. त्यापैकी शासनाने 14640 मे.टन खत मंजूर केले होते. त्यामानाने यावर्षी 2023-24 च्या खरीप हंगामासाठी 21 हजार मे.टन इतकी खताची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी 13710 मे.टन खत मंजुर करण्यात आले आहे.

यावेळेस वेळेत खतपुरवठा, व त्या वितरणातील नियोजनांत प्षी विभाग गुंतला आहे. जिल्ह्dयात मॉन्सून दाखल झाल्यानंतर खरीपाच्या पेरणी, शेत नांगरणीच्या कामांनाही गती येणार आहे. जिह्यात 65 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर भात तर अन्य पिकांसाठी सुमारे 14 हजार हेक्टरवर क्षेत्रावर लागवड होत असते. दरम्यान खरीपासाठी जिल्ह्dयात शेताच्या बांधावर खत पोहोचवण्यासाठी तयारी सुरू झालेली आहे. गावपातळीवर सोसायट्यांना खतपुरवठा होत असतो. पण अनेक सोसायट्या बंद पडलेल्dया आहेत. त्यामुळे खताचे गावपातळीवर वितरण कोलमडण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाकडून लक्ष वेधण्यात आले आहे.

खत पुरवठ्यावर नियंत्रणासाठी भरारी पथक

खत गुणवत्ता व योग्य वितरण होण्याच्या दृष्टीने जिह्यातील शेतकऱयांना कृषी निविष्ठा विकेत्याकडून विक्री होणाऱया बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी निविष्ठांचा दर्जा निकृष्ट असणे, त्यात भेसळ असणे अथवा बोगस असणे, निविष्ठांची अनधिकृत साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण करणे इत्यादी बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये खालीलप्रमाणे भरारी पथकाची स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तालुका कृषी अधिकारी (पथक पमुख), सदस्य म्हणून कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, निरीक्षक वजने मापे, मंडळ कृषी अधिकारी (संबधित कार्यक्षेत्र), कृषी अधिकारी, (गु.नि.नि.) पंचायत समिती (संबंधीत तालुका) सदस्य सचिव यांचा 2013-24 साठी भरारी पथकाची आपले स्तरावर स्थापन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरावर तकारी निवारण समिती स्थापन

बियाणे, खते व कीटकनाशके इत्यादी निविष्ठांच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या अनुषंगाने कार्यवाही बाबत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. या तक्रार निवारण समितीकडून तक्रारीबाबत तातडीने योग्य कार्यवाही होणे आवश्यक आहे. शासन परिपत्रकानुसारतक्रार निवारण समितीची रचना खालील प्रमाणे आहे. उपविभागीय कृषी अधिकारी (अध्यक्ष), तालुका कृषी अधिकारी (संबंधित तालुका) सदस्य, कृषी विद्यापीठ / कृषी संशोधन केंद्र / कृषी विज्ञान केंद्र यांचे प्रतिनिधी-सदस्य, महाबीज प्रतिनिधी-सदस्य, कृषी अधिकारी, पंचायत समिती (संबंधीत तालुका), सदस्य सचिव अशी ही समिती स्थापन करण्यात आली आहे.