खडपेवठार येथे घरातच पडलेल्या तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील खडपेवठार येथील तरुण बाथरुमला जाऊन परत येत असताना पडून जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. एकनाथ इंद्रजित माने (३८, रा. खडपेवठार, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ३) सकाळी साडेदहाच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार माने हे सकाळी बाथरुमला गेले होते. तेथून परत येत असताना पडले. त्यामध्ये जखमी झाले. तात्काळ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.