खंडाळा बाजारपेठेत वाहतूकीला अडथळा केल्या प्रकरणी चालकावर गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील खंडाळा बाजारपेठेत अन्य वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा रितीने वाहन पार्क करणार्‍या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार 14 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वा. घडली आहे.
संजय रामा तावडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहन चालकाचे नाव आहे.

त्याच्या विरोधात पोलिस काँस्टेबल शिवम आंबुलकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी सकाळी संजय तावडे याने आपल्या ताब्यातील वाहन (एमएच- 08- एएन-0052) हे खंडाळा बाजारपेठेत अन्य वाहनांच्या वाहतुकीला अटकाव होईल अशा रितीने पार्क केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात भादंवि कायदा कलम 283 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.