रत्नागिरी:- शहरातील मिरजोळे येथे हायड्रालिक क्रेनने दुचाकीला धडक दिली. याप्रकरमी क्रेन चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश कुमार शिवनाथ (रा. एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी ) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २६) रात्री आठच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांची दुचाकी (क्र. एमएच-०८ एवाय ४६९८) घेऊन मिरजोळे येथील एका सलुनच्या समोर दुचाकी उभी करुन रस्त्याच्या बाजूला थांबले होते. त्यावेळी जिमकॉम कंपनीकडून येणाऱ्या क्रेनने दुचाकीला धडक देवून अपघात केला. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.