कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून पंचनामा
रत्नागिरी:- नवविवाहितेच्या छातीत अचानक दुखून श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. नातेवाईकांनी मृतदेह घरी नेऊन बारा तास ठेवला त्यानंतर पुन्हा विच्छेनासाठी सायंकाळी सव्वा पाच वाजता जिल्हा रुग्णालयात आणला. खासगी रुग्णालयाने पोलिस प्रशासनाला कळविणे पर्याप्त होते. अखेर कार्यकारी दंडाधिकाऱी-रत्नागिरी यांनी पंचनामा केला. या प्रकारात पहाटे चारच्या सुमारास मृत झालेल्या नवविवाहितेच्या मृतदेहाची हेळसांड केल्याची चर्चा जिल्हा रुग्णालयात रंगली.
सौ. शमीम सादिक पठाण (वय २५, रा. क्रांतीनगर, झोपडपट्टी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १) सकाळी चारच्या सुमारास परकार हॉस्पिटल येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सादिक हनिफ पठाण यांची पत्नी सौ. शमिम पठाण हीने शुक्रवारी (ता. ३१) रात्री आठच्या सुमारास हिने मुलांना दुध पाजून त्यांना झोपविले. व दोघे पती-पत्नी जेवण खाण आटोपून रात्री अकराच्या सुमारास झोपी गेले होते. रात्री साडेतीनच्या सुमारास त्यांच्या पत्नी शमीम हिच्या छातीत दुखून तिला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. पती सादिक पठाण यांनी तात्काळ तिला शहरातील परकार हॉस्पिटल येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले व मृतदेह विच्छेदानासा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करावे असे पत्र दिले होते. मात्र खासगी हॉस्पिटलने पोलिस प्रशासनाला कळविले नाही. नवविवाहिता शमिमचा मृतदेह नातेवाईकांनी घरी नेला. जवळ-जवळ १२ तास हा मृतदेह ठेवला त्यानंतर सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास तिचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला. नवविवाहितेचा मृत्यू म्हणून कार्यकारी दंडाधिकारी यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









