कौटुंबिक वादातून त्या दोघांनी दुकानच पेटवले

रत्नागिरी:-नातेवाईकांसोबत झालेल्या वादातून दोघांनी थेट दुकानच पेटवून दिले. शहरानजिक अलावा येथे ही घटना घडली. कौटुंबिक वाद भडकला आणि या वादातून गुरुवारी पहाटे दुकान पेटवून दिल्याची घटना घडली.
 

यामध्ये सुमारे ४ लाखांचे नुकसान झाल्याची  तक्रार राजन विश्वनाथ तोडणकर (४२,रा.भाटिमिऱ्या ) यांनी शहर पोलीस स्थानकात दिली आहे. पहाटे दुकानाला लावलेली आग पालिकेच्या अग्निशामक दलाने विझविली. मात्र तोपर्यंत आगीमध्ये सर्व जळून खाक झाले होते.

पहाटे ०३.४५ वाजल्याचे दरम्यान गजानन नंदकुमार मयेकर व त्यांची पत्नी मयुरी गजानन मयेकर यांनी दुकानाच्या दिशेने धुर येताना दिसला म्हणुन त्यांनी दुकानाच्या दिशेने जाऊन पाहिले असता तेथे दोन इसम दुकानाजवळ आग लावत होते. जवळ जाताच ते दोघे पळून गेले अशी तक्रार देण्यात आली आहे.