कौटुंबिक कारणातून मुरुगवाडा येथील तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- पत्नी नांदत नसल्याच्या कारणातून तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपविले. ही घटना रत्नागिरी शहरातील मुरूगवाडा येथे शनिवारी सकाळी ७:५० वाजता उघडकीस आली. असरार अस्लम मस्तान (२६, रा. मालगुंडकर चाळ, मुरुगवाडा, रत्नागिरी) असे तरुणाचे नाव आहे.

याबाबत त्याच्या भावाने शहर पोलिस स्थानकात माहिती दिली आहे. त्यानुसार असरारची पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती. त्या टेन्शनमध्ये त्याने दारूच्या नशेत किचनमधील सिलिंग फॅनच्या लोखंडी हुकाला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी १०:३० वाजता असरारला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याच्या भावाने पाहिले. त्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.