रत्नागिरी:- कोस्टगार्डने नियमितपणे जहाजे तपासून पेट्रालिंग करावे. गेल्या वर्षभरातील आणि चालू जानेवारी महिन्याचा तपासणीबाबतचा अहवाल सादर करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केली.
नार्को को आॕर्डीनेशन सेंटर यंत्रणेचे जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, पोलीस निरीक्षक जनार्दन परब आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, उपविभागीय दंडाधिकारी यांनी त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या एनडीपीएस गुन्ह्यातील हद्दपारी प्रस्तावाबाबत 15 दिवसांत कार्यवाही करावी. त्याचबरोबर पालघर ते सिंधुदूर्ग कोस्टल क्षेत्रामध्ये कार्यवाही काय करण्यात आली आहे, याबाबतचा अहवालही सादर करावा.
29 नोव्हेंबरपासून आज अखेर गांजा 3 किलो 771 ग्रॅम, चरस 9 किलो 216 ग्रॅम, ब्राऊन हेराॕइन 4 ग्रॅम जप्त 4 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आले असून, 5 आरोपींना अटक केलेली आहे, अशी माहिती श्री. परब यांनी यावेळी दिली.









