रत्नागिरी:- कोव्हीड-19 च्या लसीची प्रतिक्षा संपली असून शनिवार 16 जानेवारी पासून टप्प्या टप्प्याने लसीकरण सुरवात होणार आहे. जिल्ह्याला 16 हजार 330 डोस प्राप्त झाले असून जिल्ह्यात पाच केंद्रावर लसीकरण सुरु होईल. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाच्या 14 हजार 690 जणांना लस दिली जाणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्हा शासकीय रुग्णालयात याबाबत एका बैठकीत मंत्री महोदयांनी लसीकरणाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. बैठकीत बांधकाम सभापती बाबू म्हाप, रनपचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांची उपस्थिती होती.
16 जानेवारी रोजी प्रत्येक केंद्रावर 100 याप्रमाणे एकूण 500 डोस देण्यात येणार आहेत. लसीकरणासाठीचा आवश्यक साठा काल सायंकाळी प्राप्त झालेला आहे. पहिल्या टप्प्यात प्राधान्याने सर्व आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांचे लसीकरण होणार आहे त्यानंतर पोलीस आणि महसूल कर्मचारी व अधिकारी यांचे लसीकरण होईल. त्यानंतर प्राधान्याने 50 वर्षावरील व्यक्ती ज्यांना इतर आजार (कोमॉर्बिड) आहेत अशांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
भंडारा येथील रुग्णालय आगीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रीकल ऑडीट करण्याचे निर्देश सामंत यांनी दिले होते. ते पूर्ण झाले असून त्याबाबतही बैठकीत माहिती देण्यात आली. अधिक सुरक्षेचा भाग म्हणून रुग्णालय इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट देखील करण्यात आले