जिल्ह्यात आणखी 35 कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 1555
रत्नागिरी:– रत्नागिरीत आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा रुग्णालयात टेस्टिंग लॅब मध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरला शनिवारी रात्री कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे कोविड रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर कोरोना चाचण्या होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
कोविड रुग्णालयात कोरोना टेस्ट लॅब मधील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. या डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या सर्व स्टाफला क्वारंटाईन केले जाण्याची शक्यता असल्याने कोरोना चाचण्या करणार कोण असा मोठा प्रश्न प्रशासना समोर आहे. शनिवारी आझाद कॉलनी, मांडवी आणि नाटे या भागात नवे रुग्ण सापडले आहेत.
दरम्यान सायंकाळी उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 35 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात रत्नागिरी 4, दापोली 11, कामथे 20 येथील रुग्णांचा समावेश आहे.यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1555 इतकी झाली आहे