रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचा भंग केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. चव्हाण यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार 500 रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंत दंड करण्याचे अधिकार त्या-त्या पातळीवरील प्रशासनाला देण्यात आले असून ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहेत. यामध्ये एखाद्या संस्थेने किंवा आस्थापने स्वतः कोविड अनुरूप वर्तनाचे किंवा प्रमाण कार्यालयीन कार्यपद्धती चे पालन करण्यास कसूर केले असल्यास त्या संस्थेला 50 हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. हा दंड पोलीस प्रशासन, स्थानिक नगरपंचायत, नगरपरिषद, स्थानिक ग्रामपंचायत, अन्न व प्रशासन विभागामार्फत केला जाणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे.
सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टनसिंग किंवा मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे. तर संस्था किंवा स्थापना यांनी आपल्या अभ्यागत व ग्राहक यांच्यावर कोविड अनुरूप वर्तन लावणे अपेक्षित आहे
उद्यानाच्या, शासकीय निमशासकीय, खासगी कार्यालये, दुकाने, मॉल, चित्रपटगृहे ,नाट्यगृहे, गार्डन, वस्तुसंग्रहालय, पर्यटन स्थळे, हॉटेल, भाजीपाला विक्रेते, रस्त्यावरील स्टॉल टपऱ्या इत्यादी यांच्या परिसरात एखाद्या व्यक्तीने नियमांचे पालन न केल्यास त्या व्यक्तीला दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे .
कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणतेही बस मध्ये कोविड-19 अनुरूप वर्तनात कसूर केल्यास तोंडाला मास्क नसल्यास त्या व्यक्तीला पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे .
सेवा पुरवणारे वाहन चालक मदतनीस किंवा वाहक यांनी कोविड-19 वर्तनात कसूर केली तसेच या बाबतीत मालक परिवहन एजन्सीज यांनी जर नियमांचे पालन न केल्यास 10 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात येणार आहे.









