कोरोना हद्दपार! जिल्ह्यात 24 तासात कोरोनाचा अवघा एक रुग्ण 

रत्नागिरी:- जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होत असल्याचे चित्र आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात अवघा एक रुग्ण सापडला आहे. मागील काही महिन्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत असताना सोमवारी अवघा एकच रुग्ण सापडला असल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. 

नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात 24 तासात 16 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यँत 76 हजार 149 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून  96.61 टक्के आहे. नव्याने 1 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 820 इतकी झाली आहे. 

 जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 470 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.13 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 107 तर संस्थात्मक विलीगिकरणात 94 रुग्ण उपचार घेत आहेत.