कोरोना लसीकरणात महिलांचा टक्का वाढला

रत्नागिरी:- कोरोना लसीकरणातही महिलांचा टक्का वाढत आहे. जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात पाच केंद्रांवर विशेष कोरोना लसीकरण मोहिमे घेण्यात आली. त्याला प्रतिसाद मिळाला असून 48 महिलांनी कोरोना लस घेतली.

विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला पाऊल टाकत आहेत. कोविड साथीत प्रतिबंधक उपायोजनेंतर्गत कार्यक्रमात महिलांचे महत्त्वाचे योगदान आहे. आशा, अंगणवाडी सेविकांनी कोविड काळात तळागाळात जाऊन काम केले आहे. हे विचारात घेऊन महिला दिनाचे औचित्य साधून सोमवारी (ता. 8) जिल्ह्यात पिसई, वावे, रामपूर, सायले आणि सोलगाव या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण सत्रे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यात याचा अनेक महिलांनी लाभ घेतला. लसीकरण सत्रे ग्रामीण व शहरी भागात सुरु करण्यात आली. 45 ते 59 वयोगटातील कोमॉर्बिडीटी असलेल्या व्यक्तींना कोविड लस देण्यात येणार आहे. तसेच 60 वर्षेवरील सर्व व्यक्तींना लस दिली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरण संत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. बबिता कमलापूरकर यांनी केले.