प्रकल्पग्रस्त कृती समिती ; प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्या
रत्नागिरी:- कोरोना काळात थांबवलेली भरती प्रक्रिया कोकण रेल्वे प्रशासनाने पुन्हा चालू करावी अशी मागणी प्रकल्पग्रस्त कृती समितीने केली आहे. प्रकल्पग्रस्तांना वेगळा कोटा देवून भरती तुंबवली आहे. ती खुली करुन प्रकल्पग्रस्तांना सेवेत रुजु करुन घ्यावे, असे या समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सांगितले.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीने यापूर्वीच जनता दरबार लावण्यासाठी मागणी कोकण रेल्वे पशासनाकडे केलेली आहे. पण त्याबाबत वेळोवेळी निवेदने देवून सुध्दा कोकण रेल्वे अधिकारी पुर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वेत सामावून घेण्यासाठी अन्य कोणतेही पाऊल उचललेले नाही याची खंत आहे. तसेच कोरोनाच्या कालावधीत कोकण रेल्वेने कॉन्ट्रक्टर तर्फे भरती करतानाही प्रकल्पग्रस्तांना डावळून भरती केली. हा एक प्रकारे प्रकल्पग्रस्तांवर झालेला अन्याय आहे. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी बेलापूर येथील कोकण रेल्वे मॅनेजिंग डायरेक्टर संजय गुप्ता यांना वेळोवेळी निवेदन दिले. तरीही प्रकल्पग्रस्तांना नोकरी पासून वंचित ठेवण्यात येत आहे. कोकण रेल्वे प्रकल्प उभारणीवेळी शेतका-यांच्या जमिनी घेण्यासाठी आटापिटा केला गेला. जमिनी कवडी मोल दराने घेवून प्रकल्पग्रस्तांची फसवणुक केली आहे. कोकण रेल्वेला मनुष्यबळाची गरज असताना कोकण रेल्वे कंत्राटी पध्दतीने कर्मचारी नेमले जात आहेत.
कोकण रेल्वे ने पुर्वी एकाच सातबार्यावरील 8 ते 9 लोक नोकरीत घेतली. हा एक प्रकारे भ्रष्टाचार आहे. प्रकल्पग्रस्तांना कुशल असे प्रशिक्षण देवून सेवेत रुजु करुन घेतले पाहीजे. प्रकल्पग्रस्तांना वेगळा कोटा देवून भरती तुंबली आहे, ती खुली करुन प्रकल्पग्रस्तांना सेवेत रुजु करुन घ्यावे. लोटे, चिपळूण येथे रेल्वे कारखाना होत असून तिथे तरी प्रकल्पग्रस्तांना सेवेत रुजु करुन घेतले पाहीजे. कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक, लोक प्रतिनिधी, विशेष भूसंपादन कोकण रेल्वे वर्ग (2) व कृती समिती यांची संयुक्त बैठक संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी घेण्यात येणार होती. मात्र कोरोना काळात कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक यांनी कोरोनाचे निमित्त दाखवून ती टाळली, अशी खंत श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली. कोकण रेल्वे अधिकारी वेळ मारून नेत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या येत्या काही दिवसात मान्य न केल्यास कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना रेल्वेच्छा रुळावर आत्मदहन किंवा रेल रोकोशिवाय पर्याय नाही असा इशारा दिला आहे.