रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत असताना गुरुवारी तब्बल 60 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने एकच खळबळ उडाली आहे. यात कुवारबाव परिसरात 5 तर खालची आळी येथे तब्बल 7 नवे रुग्ण सापडले आहेत.
नव्याने आलेल्या अहवालात सिविल मधील 4, टीआरपी येथील 3, चिपळूण 3, कुवारबाव 5, चवंडेवठार 1, अभ्युदय नगर 1, देवरुख 2, मारुती मंदिर 1, मेंटल हॉस्पिटल 4, पावस 1, खालची आळी 7, बाजारपेठ 1, कसोप 1, केळ्ये मजगाव 1, खंडाळा 1, साळवी स्टॉप 2, तांबट आळी 1, गवळीवाडा 1, जेलरोड 2, पोलीस मुख्यालय 3, खेडशी 3, गुडे वठार , संगमेश्वर 1, लांजा 2, उद्यमनगर 1, सैतवडे 1, आरोग्य मंदिर 3, जयगड 1 असे नवे रुग्ण सापडले आहेत.