कोरे मार्गावर ५ रेल्वेगाड्या विलंबाने

खेड:- सलग सुट्ट्यांमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्या हाऊसफुल्लच धावत आहेत. जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची चढाओढ सुरू आहे. या चढाओढीत रेल्वेगाड्यांच्या विलंबाची भर पडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शुक्रवारी ५ रेल्वेगाड्यांना ‘लेटमार्क’ मिळाला. उधना मंगळूर स्पेशल ४ तास विलंबाने धावल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. अन्य ४ गाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाला.

शुक्रवारी महावीर जयंतीच्या सुट्टीसह ‘विकेंड’ मुळे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांसह गावी येणाऱ्या चाकरमान्यांमुळे रेल्वेगाड्यांना गर्दी उसळत आहे. नियमित गाड्यांना होणाऱ्या गर्दीतून एन्ट्री मिळवताना प्रवाशांची दमछाक होत आहे. दिमतीला उन्हाळी स्पेंशल धावत असल्याने सलग सुट्ट्यांमुळे गाड्या धावताहेत हाऊसफुल्ल नागपूर-मडगाव स्पेशल १ तास गर्दीची तीव्रता काही अंशी कमी होण्यास तितकीच मदत होत आहे. आतापर्यंत कोकण मार्गावर ५ उन्हाळी स्पेशलच्या फेऱ्या धावत आहेत. शुक्रवारी २५ मिनिटे तर सीएसएमटी-मडगाव स्पेशल २ तास विलंबाने रवाना झाली. एर्नाकुलम-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस १ तास उशिराने मार्गस्थ झाली. अन्य २ रेल्वेगाड्याही विलंबाने धावल्याने अ प्रवाशांना ‘विकेंड’लाच मनस्ताप सहन करावा लागला.