कोरे मार्गावरील दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ

रत्नागिरी:- दिवाळीमुळे  प्रवासी संख्या वाढल्याने कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या कालावधीत या  आधी काही विशेष गाड्या देखील या मार्गावर धावू लागल्या आहेत. दसर्‍या दिवाळीपासून कोकण रेल्वे मार्गावर नियमित गाड्यांव्यतिरिक्त फेस्टीवल स्पेशल गाड्यांच्या फेर्‍या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागपूर, सुरत, उधना तसेच मुंबईतून देखील दिवाळीसाठी  रेल्वेच्या अतिरिक्त गाड्या करण्यात आल्या आहेत.

बुधवारी करण्यात आलेल्या घोषणेनुसार कोकण रेल्वेमार्गे धावणार्‍या हापा -मडगाव   (22908/22907)  तसेच पोरबंदर कोचुवेली (20910/20909)  या दोन नियमित एक्स्प्रेस गाड्यांना स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवण्यात आला आहे. यातील हापा मडगाव गाडीला दि. 19 ऑक्टोबरच्या फेरीपासून तर पोरबंद  – कोचुवेली या गाडीच्या दि. 20 ऑक्टोबर 2022 पासून अतिरिक्त डबा जोडण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. दिवाळीत गावी येणार्‍या चाकरमान्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.