रत्नागिरी:-कोकण रेल्वे मार्गावर करमाळी ते वर्णा दरम्यान जुआरी पुलाजवळ ४ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सहा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. त्या गाड्या अर्ध्या तासाहून दीड तासापर्यंत उशिरा धावणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील जुआरी पुलाच्या अपग्रेडेशनचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी काही गाड्या करमाळी ते वेर्णा दरम्यान उशिरोन सोडल्या जातील. त्यात ४ ऑक्टोरबला मुंबई सीएसटीएम ते मडगाव करमाळीजवळ ९० मिनीटे उशिराने धावेल, ५ ऑक्टोबरला लोकमान्य टिळक-मडगाव ३० मिनीटे, एर्नाकुलम-पुणे ३० मिनीटे, निजामुद्दीन-एर्नाकुलम गाडी ३० मिनिटे तर ६ ऑक्टोबरला धावणारी मुंबई सीएसटीएम-मडगाव गाडी ११० मिनीटे धावणार आहेत.