नूतन केंद्रीय कार्यकारिणी जाहीर : उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अनुप कर्णिक विश्वस्त मंडळावर
रत्नागिरी:- कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नव्या केंद्रीय कार्यकारिणीची निवड सन २०२५-२८ या कालावधीसाठी एकमताने करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदी नमिता रमेश कीर यांची व कार्याध्यक्षपदी डॉ. प्रदीप ढवळ यांची फेरनिवड करण्यात आली. विश्वस्त मंडळावर पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, अनुप कर्णिक यांची निवड करण्यात आली आहे.
कुडाळ येथे मराठा समाज मंडळाच्या सभागृहात् शनिवारी कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभाही घेण्यात आली. यावेळी ही निवड जाहीर करण्यात आली.
तीन वर्षासाठी केंद्रीय कार्यकारिणी कायम ठेवण्यात आली आहे. ही सर्वसाधारण बैठक अध्यक्षा नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ हे देखील उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी उपस्थित केंद्रीय कार्यकरिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष कीर व ढवळ यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष नमिता कीर म्हणाल्या, मला अध्यक्षपदी पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. निश्चितपणे कोकण मराठी साहित्य परिषद अधिक जोमाने वाढविण्यात येईल. युवा शक्तीला बळ देण्याचे कामही केले जाईल.
संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या विचारधारेने आम्ही निश्चितपणे साहित्य चळवळ पुढे नेण्याचे काम करू, असे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ म्हणाले, यावेळी या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कर्जत, पनवेल, नवी मुंबई आदी सर्व भागातील जिल्हा अध्यक्ष तसेच जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.
नवीन कार्यकारिणी- विश्वस्त उदय रवींद्र सामंत, संजय केळकर, अनुप कर्णिक, प्रा. एल. बी. पाटील, रेखा नार्वेकर. कार्यवाह माधव विश्वनाथ अंकलगे, दीपा ठाणेकर, प्रकाश सुंदर दळवी (रत्नागिरी), केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मंगेश आत्माराम मस्के, रुजारिओ पास्कल पिंटो, आनंद शांताराम शेलार, बाळासाहेब लबडे, संजय गुंजाळ, गणेश सखाराम कोळी, मोहन नशिकेत भोईर, रूपचंद भगत, विद्या विठ्ठल प्रभू जगदीश भोवड, तुकाराम विठ्ठल कांदळकर, योगेश जोशी, प्रवीण नारायण दवणे, सुहास परशुराम राऊत.
विविध समित्यांचे प्रमुख : केंद्रीय साहित्य संमेलन समिती – केंद्रीय अध्यक्ष, केंद्रीय कार्याध्यक्ष, झपुर्झा प्रकाशन समिती- नमिता रमेश कीर, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन व पुस्तकांचे गाव समिती-गजानन पाटील, महिला साहित्य संमेलन समिती-वृंदा कांबळी, युवाशक्ती-दृक्षिण कोकण (रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्हे) अरुण तुकाराम मोर्ये.
नाट्य समिती-डॉ. अनिल बांदिवडेकर, किरण येलये, मंदार टिल्लू अमेय धोपटकर, समन्वय समिती-रवींद्र आवटी, जयेंद्र भाटकर, अनंत वैद्य, अशोक बागवे, चंद्रमोहन देसाई, विधी व कायदा समिती-अॅड. स्वाती दिक्षीत, लेखापरीक्षण समिती मधुकर टिळेकर, कोमसाप भवन ब्रांधकाम समिती-गजानन पाटील, माधव अंकलगे, प्रकाश दळवी, संदीप वालावलकर अशी कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.