कोतवडे, नाचणे सरपंचांसोबत पंतप्रधान साधणार थेट संवाद

रत्नागिरी:- केंद्र सरकारची जलजीवन मिशन योजना यशस्वीरित्या राबविल्या बद्दल रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे, नाचणे या दोन सरपंचाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे थेट संवाद साधणार आहे.दि. ३१ मेला पंतप्रधान शिमला येथून सरपंचाशी संवाद साधतील.

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  पंतप्रधान नरेंद्र  मोदी हे  जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) या राष्ट्रीय ध्वजांकित योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे दि .३१  मे रोजी शिमला, हिमाचल प्रदेश येथून संवाद साधणार आहेत. 

रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे, नाचणे या दोन ग्रामपंचायतींनी गावात जलजीवन मिशन योजना यशस्वीरित्या राबविली आहे. याची दखल  थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. पंतप्रधान दोन्ही ग्रामपंचायतींच्या सरपंचासोबत संवाद साधून या योजनेचा गावाला मिळालेला लाभ,योजना राबविताना येणार्या अडचणीही जाणून घेणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील नाचणे सरपंच श्री.ऋषिकेश भालचंद्र भोंगल, कोतवडे सरपंच श्री . तुलीप लतीफ पटेल या दोन सरपंचाना पंतप्रधानांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली आहे.