रत्नागिरी:- वाशिष्टी पुलावरील पाणी कमी न झाल्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने आणखी सात गाड्या रद्द केल्या आहेत.
त्यात मत्स्यगंधा एक्स्प्रेस, सीएसटीएम मंगलूर विशेष, दादर तिरुणवेल्ली डेली स्पेशल, मुंबई मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस, मडगाव मुंबई कोकणकन्या, सावंतवाडी दादर तुतारी आणि दादर सावंतवाडी तुतारी यांचा समावेश आहे. तसेच नेत्रावती एक्सप्रेस, हिसार कोईबतूर विकली, वेरावलं तिरुवानतपुरम, हापा मडगांव या गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.









