रत्नागिरी:-कोकण रेल्वेत वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. रत्नागिरी रेल्वे स्थानक ते भोक रेल्वे स्थानकाच्या प्रवासादरम्यान वृध्द महिलेचे १८ हजार ८०० रुपयांचे दागिने लांबवल्याची घटना २६ मार्च रोजी घडली होती. याबाबतची फिर्याद गिता निवलेकर (५२, मुंबई ) यांनी १७ मे रोजी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवलेकर या मेंगलोर एक्स्प्रेसने प्रवास करत करत होत्या. भोके रेल्वे स्थानकादरम्यान त्यांची बॅग अज्ञात चोरटयाने लांबवली. या बॅगेत १८ हजार रुपये किंमतीची सोन्याची कर्णफुले, ८०० रुपये किंमतीची रोख रक्कम असा एकूण १८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार अज्ञातावर भादविकलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.