रत्नागिरी:- रत्नागिरी-कोकण रेल्वेमार्गावरील सावर्डे-रत्नागिरी विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी २३ फेब्रुवारीला सकाळी ७ ते साडेनऊ या वेळेत अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
या मेगाब्लॉकमुळे २ रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले. या मेगाब्लॉकमुळे एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस २२ फेब्रुवारीला मडगाव-रत्नागिरी विभागादरम्यान १ तास ४५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.ति रूनेलवल्ली-गांधीधाम एक्स्प्रेस १ तास २० मिनिटे थांबवण्यात येणार आहे. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.