परिवहन मंत्री ना.प्रताप सरनाईल, पालकमंत्री ना.उदय सामंत यांची उपस्थिती
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांचेमध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार रत्नागिरी जिल्हातील रा.प. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक नुतनीकरण व वाहनतळ काँक्रीटीकरण करणेचे काम महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ रत्नागिरी यांचे कडून हाती घेणेत आले होते.
रा.प. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक नुतनीकरण व वाहनतळ काँक्रीटीकरण करणेचे कामासाठी अंदाजे रु.१७.५० कोटी इतका निधी मंजूर करणेत आलेला आहे. त्यानुसार सदर कामास फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरुवात करणेत आले होते. सदर कामामध्ये भव्यदिव्य प्रशस्त असे ग्रामीण व शहरी एकत्रित बसस्थानक बांधण्यात आले आहे.
या बस स्थानकात विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देणेत आल्या आहेत. त्यामध्ये प्रशस्त बसस्थानक इमारत. ग्रामीण बसेस करीता १४ फलाट व शहरी बसेस करीता ६ फलाटांची व्यवस्था उपलब्ध केलेली आहे.रा.प.चालक व वाहक (महिला व पुरुष) यांचे करीता सर्व सोयींयुक्त
वातानुकूलित विश्रांतीगृह, सर्व सोयींयुक्त वातानुकूलित हिरकणी कक्ष, स्थानक प्रमुख कार्यालय, रा.प.चे इतर कार्यालये, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र पोलीस नियंत्रण कक्ष, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष, विद्यार्थी पास व आरक्षण कक्ष, पार्सल कक्ष, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र प्रशस्त उपहारगृह, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह प्रशस्त प्रवाशी प्रतिक्षालय, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र महिला व पुरुष प्रवाशी प्रसाधनगृह.
स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, ग्रामीणसाठी ६ वाणिज्य अस्थापना गाळे व शहरीसाठी १८ वाणिज्य गाळे उपलब्ध करून दिले आहे, संपूर्ण बसस्थानक वाहनतळास काँक्रीटीकरण व ड्रेनेज व्यवस्था करणेत आलेली आहे.अशा या भव्यदिव्य रा.प. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक (ग्रामीण व शहरी) वस्तूचे लोकार्पण सोहळा दि.११ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता ना. प्रताप सरनाईक मंत्री, परिवहन तथा अध्यक्ष म.रा.मा.प. महामंडळ महाराष्ट्र राज्य व ना.उदय सामंत मंत्री, उघ्द्योग व मराठी भाषा तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांचे हस्ते व प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे अशी माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.