रत्नागिरी:- कोकणातील जिल्ह्यांचा समावेश फळबाग क्लस्टर श्रेणीत करण्यात आला आहे. अपेडाच्या मार्गदशर्र्नाखाली केंद्र सरकारच्या पीक संरक्षण विभागाच्या प्रतिनिधींसमवेत संयुक्तपणे काम करण्याचा प्रयत्न केल्याने कोकणात पहिल्यांदाच हे मानांकन मिळाले असून, ‘अपेडा’ने अलीकडेच या प्रकल्पावर शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी सहा फळबाग समूह तयार करण्यात आहेत. यामध्ये कोकणचा समावेश करण्यात आला आहे. हॉर्टिकल्चर क्लस्टर या संकल्पनेवर पहिल्यादांच राज्य आणि केंद्र या माध्यमातून संयुक्तपणे काम करणार आहे. निर्यातीला प्रोत्साहन मिळण्यासाठी तयार होणार्या या समुहांमध्ये फलोत्पदनांच्या दर्जेदार उत्पादनासाठी जिल्हानिहाय समूह समित्या तयार करण्यात येणार आहे. समितीचे अध्यक्षपद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांना देण्यात आले आहे.केंद्रातील ‘अपेडा’चे प्रतिनिधी या समितीत राहून समन्वयाचे काम करणार
आहे.
तसेच केंद्र शासनाच्या पीक संरक्षण विभागाचा एक प्रतिनिधी सल्लागार सदस्य म्हणून काम करणार आहे. या शिवाय राष्ट्रीय संशोधन केंद्र व कोकण कृषी विद्यापीठांमधील त्या -त्या फळ पिकांमधील शास्त्रज्ञ या समितीत घेतले जाणार आहेत.
निर्यातदार शेतकर्यांना देखील समितीत स्थान देऊन एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने हापूस, नारळ, कोकम, चिकू, पेरू, केळी आणि काजू या कोकणी फलोत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे. केरळमध्ये ‘अपेडा’ने हा प्रकल्प यशस्वी केला असून, आता महाराष्ट्रात या प्रयोगाची सुरुवात कोकणातून करण्यात येणार आहे.