केळ्ये मजगाव येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- दुपारच्या वेळेत जेवण करुन झोपलेला तरुण बेशुद्ध झाला. तोंडातून लाळ आली होती. त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात नेले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. अक्षय श्रीकांत बाचरे (वय २९, रा. केळ्ये आंबेकोड, केळ्ये मजगाव, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १४) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अक्षय बाचरे हा गांधी डिस्टुब्लुटर्स या एजन्सीत कामाला होता. दुपारच्या वेळी तो जेवून झोपला होता. तो बेशुद्ध झाला त्याच्या तोंडातून लाळ येत होती. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.