केरळातील मासेमारी बोटीवरील खलाशाचा मिरकरवाडा बंदरात मृत्यू

रत्नागिरी:- केरळातून मासेमारीसाठी रत्नागिरी समुद्रात आलेल्या खलाशांची बोट नादुरुस्त झाली. बंद पडलेली बोट कस्टम च्या अखत्यारीत दुरुस्तीसाठी मिरकरवाडा बंदराकडे येत असताना केरलातील खलाश्याला अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. सबस्टेन एस (वय ४६, रा. तिरुअनंतपुरम्, केरळ) असे मृत खलाशाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार केरळातून मासेमारीसाठी आलेली बोटीचे इंजीन बंद पडले होते. कस्टम अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ती बोट मिरकरवाडा येथे आणत असताना खलाशी सबस्टेन एस याला अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.