एलसीबीची कारवाई; दोघांना अटक
रत्नागिरी:- रत्नागिरीतील मौजे कोळंबे दामले कंम्पाऊड येथील टेलिफोन पोलवरील बीएसएनएल कंपनीची 200 मिटर केबलची चोरी करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांकडून 15 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
या चोरी प्रकरणी पूर्णगड पोलीस स्थानकात 12 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. टेलीफोन पोलवरील बीएसएनएल कंपनीची सुमारे 200 मीटर केबल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली होती. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरु होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक चोरी झालेल्या भागामध्ये गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने कार्यरत होते. सदर पथकाला तपासदरम्याने नमुद गुन्हयातील आरोपीबाबत व चोरीस गेलेला मुद्देमालाबाबत गोपनीय माहीती प्राप्त झालेली होती. त्या माहीतीच्या आधारे कोळंबे फाटा या ठिकाणी सदर पथकाने सापळा रचून 2 संशयीत इसमाना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेले संशयित आरोपींमध्ये धनंजय चंद्रकांत गोरीवले (वय 25) तृशांत चंद्रकांत गोरीवले (वय 22 दोन्ही रा. कोळंबे गोरीवलेवाडी) या दोघांकडे अधिक चौकशी करता त्यांनी गुन्ह्राची कबुली दिलेली असून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेली पाच हजार किंमतीची केबल व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकूण 15,000/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक डॉ.श्री. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री.विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासने, पोउनि-विकास चव्हाण, पोहेकॉ- संदिप कोळंबेकर, संजय कांबळे, पोना-विजय आंबेकर, सागर साळवी, उत्तम सासवे, दत्ता कांबळे, यांनी केलेली आहे.