रत्नागिरी:- जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सकाळी रत्नागिरीत दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा भाजपच्यावतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. आज सकाळपासून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून व पुष्पहार अर्पण करून होणार आहे.
रत्नागिरीमध्ये जमावबंदी आदेश असतानाही यात्रा होणार आहे. तसेच यामुळे मारुती मंदिर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आलेले दिसत आहे. मारुती मंदिर सर्कल व आजूबाजूच्या परिसर संपूर्णपणे भाजपच्या झेंड्यांनी भाजप मय झालेला दिसत आहे. रत्नागिरी शहर व अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज संपूर्ण दिवस केंद्रीय मंत्र्यांचा रत्नागिरी शहरांमध्ये व्यस्त कार्यक्रम आहे केंद्रीय मंत्री राणे आंबा बागायतदारांचे देखील चर्चा करणार आहेत. राणे यांची जन आशीर्वाद यात्रा परत एकदा रत्नागिरीतून सुरु होणार आहे. दुपारी केंद्रीय मंत्री राणे यांची पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेत ते काही महत्त्वाचे वक्तव्य करणार का याकडे लक्ष लागले आहे.